Deuteronomy 18:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांच्या एखाद्या नगरात राहणार्‍या कोणा लेव्याला परमेश्वराने निवडलेल्या स्थानी जाण्याची इच्छा झाली तर त्याने जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर एखाद्या लेवीची इस्राएली राष्ट्राच्या एका नगरातून दुसर्‍या नगरात जाऊन राहण्याची कळकळीची इच्छा असल्यास आणि तो याहवेहने निवडलेल्या पवित्रस्थानी येऊन राहिल्यास,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्यास काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कोणत्याही नगरात राहणारा कोणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्यास मुभा आहे.