Deuteronomy 19:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शेजाऱ्याच्या जमिनीची हद्द दाखवणारे दगड दूर करु नका. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे दगड म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढी जमीन दिली त्याच्या खुणा होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला मिळणार्या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरवलेली आपल्या शेजार्याच्या सीमेची खूण सरकवू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत.