Deuteronomy 19:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे नगर फार दूर असेल तर त्याला तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्याला त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. यास्तव मुळात त्या माणसाच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशी नगरे नसली तर त्याला फार दूर जावे लागेल आणि रक्तपाताबद्दल सूड घेणारा रागाच्या भरात त्याला गाठून मारून टाकील. खरे पाहता तो प्राणदंडास पात्र नाही, कारण पूर्वी त्याचे त्याच्याशी वैर नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.