Deuteronomy 2:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कादेश-बणर्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोंचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या गोटातील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने हे भाकित केलेच होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण कादेश-बर्ण्या सोडून जेरेद नाल्यापलीकडे गेलो, त्याला अडतीस वर्षे लागली; ह्या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या सबंध पिढीतल्या योद्ध्यांचा छावणीत नाश झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण कादेश-बरनेआहून निघून जेरेद ओहोळ ओलांडून जाण्यास आम्हाला तब्बल अडतीस वर्षे लागली, कारण याहवेहने घेतलेल्या शपथेमुळे लढाऊ पुरुषांची संपूर्ण पिढी छावणीतून नष्ट झाली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कादेश बर्ण्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या पिढीतील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने शपथ वाहिल्या प्रमाणे हे झाले.