Deuteronomy 2:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा एसावचे वंशज राहात असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन - गेबर वरुन येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबच्या रानातल्या रस्त्याला आपण वळलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून सेईरचे रहिवासी आपले भाऊबंद जे एसावाचे वंशज ह्यांना चुकवून आपण अराबाच्या मार्गाने एलाथ व एसयोन-गेबर ही मागे टाकून पुढे गेलो. मग आपण वळून मवाबातील रानाकडल्या मार्गाने गेलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून आम्ही सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशातील भाऊबंदांच्या देशाला वळसा घालून दक्षिणेकडे एलाथ व एजिओन-गेबेरकडे जाणारा अराबाचा रस्ता पार करून उत्तरेकडे प्रवास करीत मोआब वाळवंटाकडे निघालो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एसावचे वंशज राहत असलेल्या सेईर वरुन आपण गेलो. एलाथ आणि एसयोन-गेबेर वरून येणारा अराबाचा मार्ग आपण सोडला आणि मवाबाच्या रानातल्या रस्त्याला आपण वळालो.