Deuteronomy 24:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते. ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नकोस. ठेवलीस तर तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्हाणे करील आणि तुला पाप लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना दररोज सूर्य मावळण्यापूर्वीच त्यांची मजुरी द्यावी, कारण ते गरीब आहेत आणि ते त्या मजुरीवर अवलंबून आहेत. नाहीतर ते तुमच्याविरुद्ध याहवेहकडे गार्हाणे करतील व मग ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.