Deuteronomy 28:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उलटपक्षी, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तर पुढील सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील: