Deuteronomy 28:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील.