Deuteronomy 28:54 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्यातला जो पुरुष कोमल हृदयाचा व अत्यंत नाजूक प्रकृतीचा असेल तोही आपल्या भावाकडे, प्राणप्रियेकडे व आपली वाचलेली अपत्ये ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्यातील अत्यंत कोमलहृदयी व सुसंस्कृत पुरुषाला देखील आपला भाऊ, आपली प्राणप्रिय पत्नी आणि जगून वाचून राहिलेल्या मुलांवरही दयामाया येणार नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत.