Deuteronomy 28:57 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या पोटचा गोळा, आपल्याला झालेली मुले, ह्यांच्याकडे निष्ठुर दृष्टीने पाहील; कारण वेढा पडल्यामुळे व शत्रूने तुला कोंडीत धरल्यामुळे सर्व वस्तूंची तिला वाण पडेल आणि ती गुप्तपणे त्यांना खाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्याच पोटचा गर्भ व आपल्याच पोटची मुले स्वतःलाच गुप्तपणे खाता यावी म्हणून ती लपवून ठेवील. अशाप्रकारे या वेढ्याच्या काळातील भूक खूप भयानक असेल आणि तुमच्या शत्रूकडून तुम्हाला तुमच्याच वेशींच्या आत भयंकर संकट व यातना भोगाव्या लागतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूति वेळी बाहेर पडणारे सर्वकाही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.