Deuteronomy 32:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे लोकांना म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो त्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी आज मी तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे लोकांस म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा.