Deuteronomy 33:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवींविषयी मोशे असे म्हणाला, “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवींची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करुन घेतलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लेवीविषयी तो म्हणाला, ‘तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्ताजवळ राहोत;’ त्याला तू मस्सा येथे पारखले, मरीबाच्या झर्याजवळ तू त्याच्याशी झुंजलास;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवीविषयी मोशे असे म्हणाला: “लेवी तुझा खरा अनुयायी आहे. तो थुम्मीम व उरीम बाळगतो. मस्सा येथे तू लेवीची कसोटी पाहिलीस. मरीबाच्या झऱ्याजवळ, ते तुझेच आहेत याची तू कसोटी करून घेतलीस.