Deuteronomy 34:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्याला नवा नेता म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.