Deuteronomy 4:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर माणूस निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकिवात तरी आहे का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत विचारून पाहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्या आधी होऊन गेलेल्या दिवसांना विचारा आणि आकाशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत विचारा की, अशा प्रकारची महान गोष्ट पूर्वी कधी घडली होती का किंवा अशी गोष्ट कुठे घडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का?