Deuteronomy 9:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोकं म्हणतील, ‘परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशील तर ज्या देशातून तू आम्हांला काढून आणलेस, तेथले लोक म्हणतील की, जो देश त्यांना देण्याचे परमेश्वराने वचन दिले होते तेथे त्यांना त्याला नेता आले नाही आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून तो त्यांना रानात मारून टाकण्यासाठी घेऊन गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जर तुम्ही यांचा नाश केला, तर ज्या देशामधून तुम्ही आम्हाला बाहेर आणले ते लोक म्हणतील, ‘वचनदत्त देशात त्यांना नेण्यास त्यांचा याहवेह असमर्थ होता आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून त्याने त्यांचा नाश केला व त्यांना ठार मारण्यासाठीच त्याने त्यांना रानात नेले.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील, परमेश्वर त्यांना स्वत:च कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता. म्हणून मारुन टाकण्यासाठीच त्याने त्यांना रानात आणले.