Ecclesiastes 1:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी स्वत:शीच म्हणालो: “मी खूप शहाणा आहे. माझ्या आधी ज्या राजांनी यरुशलेमवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी शहाणा आहे. शहाणपण आणि ज्ञान म्हणजे खरोखर काय ते मला माहीत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपल्या मनाशी म्हणालो, “माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे; ज्ञान व विद्या ह्यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.”