Ecclesiastes 1:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वारा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे वाहतो. वारा गोल गोल घुमतो आणि नंतर त्याने ज्या ठिकाणाहून वाहायला सुरवात केली होती तिथून तो परत वाहायला लागतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो; तो एकसारखा घुमत जाऊन पुनःपुन्हा आपली फेरी करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो; तो गोल गोल भ्रमण करीत आपल्या ठिकाणी परत जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो, नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून आणि पुन्हा माघारी येतो.