Ecclesiastes 10:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण राजा जर चांगल्या घराण्यातून आलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे, आणि तुझे अधिपती नशेसाठी नाहीतर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तुझा देश आनंदीत आहे.