Ecclesiastes 12:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्हाला नीट ऐकूही येणार नाही. तुम्हाला रस्त्यावरचा गोंधळ ऐकू येणार नाही. धान्य दळताना येणारा जात्याचा आवाज देखील तुम्हाला शांत वाटेल. बायकांची गणी तुम्ही ऐकू शकणार नाही. पण साध्या पक्ष्याच्या गाण्याचा आवाजसुध्दा तुम्हाला सकाळी जाग आणील. कारण तुम्ही झोपू शकणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील; पक्ष्याच्या शब्दानेदेखील त्याच्या निद्रेचा भंग होईल; सर्व गायनस्वर2 मंदावतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील आणि जात्याचा आवाज मंद होईल; जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील, परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यासमयी जेव्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आणि जात्याचा आवाज थांबेल, तेव्हा पक्ष्याच्या शब्दाने मनुष्य बिथरेल, आणि मुलींच्या गायनाचास्वर लुप्त होईल.