Ecclesiastes 12:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरुण असेपर्यंत तुमच्या निर्मात्याची आठवण ठेवा. चंदेरी दोर तुटण्याआधीआणि सोनेरी भांडे फुटण्याआधी, तळाशी फुटलेल्या काचेच्या भांडचासारखे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी, विहिरीवर ठेवलेले दगडी झाकण फुटून आत पडून निरुपयोगी होते तसे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झर्‍याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्‍यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, रुप्याची तार तुटण्यापूर्वी किंवा सोन्याचा कटोरा चेपण्यापूर्वी, अथवा झऱ्याजवळ घागर फुटण्यापूर्वी, अथवा पाण्याचा रहाट विहिरीकडे मोडला जाईल,