Ecclesiastes 2:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी स्वत:साठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्याच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्य गोष्टी माझ्याजवळ होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्‍या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्‍या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या.