Ecclesiastes 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी आयुष्यात लोकांना बघितले आहे आणि मला हे माहीत आहे. लोक त्या तरुणाचेच ऐकतील. तोच नवीन राजा बनेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि, जे सर्व जिवंत भूतलावर चालतात त्यांना मी पाहिले, जो दुसरा तरुण त्याच्या जागी राजा म्हणून उभा राहिला ते त्यास शरण गेले.