Ecclesiastes 5:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पुथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या मुखाने बोलण्याची घाई करू नको, आणि देवासमोर कोणतीही गोष्ट उच्चारायला तुझे मन उतावळे करू नको. देव स्वर्गात आहे पण तू तर पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे शब्द मोजकेच असावे.