Ecclesiastes 5:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही देशांत गरीब लोकांवर खूप कष्ट करायची सक्ती केली जाते. गरीबांच्या बाबतीत हे अन्यायकारक आहे हे तुम्ही जाणाता. हे गरीबांच्या हक्काविरुध्द आहे. पण आश्चर्य वाटून घेऊ नका. जो राजा त्यांना हे करायला भाग पाडतो त्याला भाग पाडणारा ही एक राजा आहे. आणि या दोघांना भाग पाडायला लावणारा आणखी एक राजा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा काही प्रांतात गरीब लोकांवर जुलूम होत आहे आणि न्याय व योग्य वागवणूक त्यांना मिळत नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण वरीष्ठ मनुष्यावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते.