Ecclesiastes 7:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला मृत्यूहूनही दु:खदायी अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय; तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे; तिचे हात शृंखला आहेत; जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो; पापी तिच्या तावडीत सापडतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की, एक स्त्री जी एक पाश आहे, जिचे हृदय एक सापळा आहे जिचे हात साखळीप्रमाणे आहेत. जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील, परंतु पापींना ती पाशात अडकवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली, तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे, आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत. जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो. पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो.