Ecclesiastes 8:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणसांची भव्य आणि सुंदर प्रेतयात्रा मी पाहिली. प्रेतयात्रेहून परत जाताना लोक मेलेल्या दुष्टांबद्दल चांगले बोलत होते. ज्या शहरात दुष्टांनी खूप वाईट गोष्टी केल्या त्याच शहरात हे घडेले. हे फारच अविचारी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्‍यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हेसुद्धा निरुपयोगी आहे.