Ecclesiastes 8:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट लोक देवाला मान देत नाहीत म्हणून त्यांना खरोखरच चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्या दुष्टांना भरपूर आयुष्य लाभणार नाही. त्यांचे आयुष्य सूर्य अस्ताला जाताना लांब लांब होणाऱ्या सावल्यांसारखे नसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण दुष्टाचे हित होणार नाही. त्यास दीर्घायुष्य लाभणार नाही. त्यांचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो देवाला मान देत नाही.