Ecclesiastes 8:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी आनंदाची शिफारस केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे व आनंद करावा यापेक्षा सूर्याच्या खालती त्यास काही उत्तम नाही. कारण त्याच्या आयुष्याचे जे दिवस देवाने त्यास पृथ्वीवर दिले आहेत त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळ राहील.