Ecclesiastes 8:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव ज्या असंख्य गोष्टी करतो त्याही मी पाहिल्या आणि देव पृथ्वीवर ज्या गोष्टी करतो त्या लोकांना कळणे शक्य नसते. एखादा माणूस ते समजून धेण्याचा प्रयत्न करील पण त्याला ते अशक्य आहे. एखाद्या विद्धान माणसाने जरी असे म्हटले की त्याला देवाचे काम समजते. तरी ते खरे नसते. त्या सर्व गोष्टी कळणे कोणालाही शक्य नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी परमेश्वराने केलेले सर्वकाही पाहिले. सूर्याखाली होणार्‍या कार्याला कोणीही समजू शकत नाही. शोध घेण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही त्याचा अर्थ कळू शकत नाही. जरी सुज्ञ लोक ते माहीत असल्याचा दावा करतात, तरी त्यांनाही ते खचितच समजू शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा देवाचे सर्व काम पाहून मला समजले की, जे काम भूतलावर करण्यात येत आहे ते मनुष्यास पुरते शोधून काढता येत नाही, कारण ते शोधून काढायला मनुष्याने कितीही श्रम केले तरी ते त्यास सापडणार नाही आणि याव्यतिरिक्त, कोणी ज्ञानी मनुष्याने, मी ते जाणीन, असे जरी म्हटले, तरी त्यास ते सापडणार नाही.