Ecclesiastes 9:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढच्या क्षणी काय घडणार आहे ते माणसाला कळत नाही. तो जाव्व्यात अडकलेल्या माश्यासारखा असतो. माशालाही काय घडणार आहे ते माहीत नसते. तो सापव्व्यात अडकलेल्या पक्ष्यासारखा असतो. पक्ष्यालाही पुढे काय घडणार आहे ते माहीत नसते. त्याच प्रमाणे माणूसही अचानक घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या सापव्व्यात अडकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही: जसा मासा त्या क्रूर जाळ्यात सापडतो, किंवा पक्षी फासात अडकला जातो, तसेच लोकसुद्धा त्यांच्यावर अचानक पडलेल्या वाईट समयात अडकले जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणालाही त्याचा मृत्यू समय माहीत नाही, जसा मासा मरणाच्या जाळ्यात सापडतो, किंवा सापळ्यात अडकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, त्याचप्रमाणे जनावरे, मानवजात अरिष्टाच्या समयी, तो त्यांच्यावर अचानक येऊन पडला म्हणजे सापळ्यात अडकतो.