Ecclesiastes 9:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्या शहरात एक विद्धान होता. तो विद्धान गरीब होता. पण त्याने आपल्या शहाणपणाचा उपयोग शहर वाचवण्यासाठी केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरुन गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्या शहरात एक विद्वान होता. तो विद्वान गरीब होता. पण त्याने आपल्या ज्ञानाने त्या शहराचा बचाव केला. सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब मनुष्यास विसरून गेले.