Ephesians 1:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे ख्रिस्तावरील आपल्या निष्ठेमुळे त्याने आपल्याला त्याचे वारसदार म्हणून निवडले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो,