Ephesians 2:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांची शारीरिक सुंता झालेली आहे व जे स्वतःला सुंता झालेले असे म्हणवून घेत असत अशा यहुदी लोकांकडून तुम्ही पूर्वी जन्माने यहुदीतर लोक म्हणविले जात होता; म्हणजेच शरीराची सुंता न झालेले म्हणून ओळखले जात होता, हा तुमचा पूर्वेतिहास लक्षात आणा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्‍या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.