Ephesians 4:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वत:ला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे.