Ephesians 4:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्‍यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल.