Ephesians 5:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंत:करणात प्रभूसाठी गायन गा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्तोत्रे, भक्तिगीते व अध्यात्मिक गाणी तुमच्यामध्ये गात राहून तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूसाठी गायन-वादन करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा.