Ephesians 6:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जेव्हा मी संदेश देण्यासाठी उभा राहीन, तेव्हा देवाने मला त्याचा संदेश द्यावा म्हणजे धैर्याने मला शुभवर्तमानाचे रहस्य लोकांना कळविता यावे, म्हणून माझ्यासाठीही प्रार्थना करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, की जेव्हाही मी बोलेन तेव्हा मला शब्द सुचावेत, व मी निर्भयपणे शुभवार्तेचे रहस्य स्पष्ट करून सांगावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,