Esther 1:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकशेऐंशी दिवसांचा हा काळ संपल्यावर राजा अहश्वेरोशने आणखी एक मेजवानी दिली. ती सात दिवस चालली. राजवाडयाच्या अंतर्भागातील उद्यानात ही मेजवानी होती. तिथे शूशन या राजधानीच्या शहरातील समस्त लहान थोरांना आमंत्रित केले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एवढे दिवस गेल्यावर राजाने शूशन राजवाड्यात आलेल्या लहानथोर लोकांना राजमंदिराच्या बागेच्या पटांगणात सात दिवस मेजवानी दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे दिवस संपल्यानंतर, राजाने शूशन राजवाड्यातील लहानापासून थोरापर्यंत सर्वांना राजवाड्याच्या अंगणातील बागेत मेजवानी दिली, जी सात दिवस चालली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते दिवस संपले, तेव्हा राजाने सात दिवसपर्यंत मेजवानी दिली. शूशन राजवाडयातील सर्व लोकांस, लहानापासून थोरांपर्यंत होती, ती राजाच्या राजवाड्यातील बागेच्या अंगणात होती.