Esther 2:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संध्याकाळी ती राजाकडे जाई. सकाळी ती दुसऱ्या अंत:पूरात परत येत असे. तिथे शाशगज नांवाच्या खोजाकडे तिला हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्न्यांची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी मुलगी पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलवे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संध्याकाळी ती जात असे; आणि सकाळी ती उपपत्न्यांचा रक्षक राजाचा खोजा शाशगज ह्याच्या देखरेखीखाली दुसर्या अंतःपुरात जाई; राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलावल्यावाचून ती पुन्हा त्याच्याकडे जात नसे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.