Esther 2:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारा वरील राजाचे पहारेकरी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत मर्दखय राजद्वारी बसत असे; तेव्हा राजाच्या द्वारपाळांपैकी त्याचे दोन खोजे बिग्थान व तेरेश हे कोपायमान होऊन अहश्वेरोश राजावर हात टाकण्याची संधी पाहत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी मर्दखय राजवाड्याच्या द्वारात बसलेला असताना, राजाचे दोन अधिकारी बिग्थान व तेरेश, जे राजवाड्याच्या द्वारी द्वारपाल होते, ते राजावर संतापले आणि अहश्वेरोश राजाचा वध करण्याचा त्यांनी कट केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारातील राजाचे अधिकारी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले.