Esther 2:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हेगेला एस्तेर आवडली. तिच्यावर त्याची मर्जी बसली. त्यामुळे त्याने तिला ताबडतोब सौंदर्योपचार आणि खास आहार दिला. राजवाड्यातील सात दासींची हेगेने निवड केली आणि एस्तेरच्या दिमतीला त्यांना नेमले. एस्तेरला आणि त्या सात दासींना त्याने अंत:पुरातील सगव्व्यात चांगल्या जागी हलवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिच्यावर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजनपदार्थ आणि तिला निवडक अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतःपुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एस्तेरला पाहून अंतःपुराचा अधिकारी हेगाइची कृपादृष्टी तिच्यावर झाली; आणि लगेचच तिच्यासाठी त्याने सौंदर्यप्रसाधनांची व खास भोजनपदार्थांची व्यवस्था केली. राजवाड्यातील सात दासी तिच्या तैनातीला त्याने दिल्या व तिला त्यांच्यासह अंतःपुरातील सर्वात उत्तम दालनात हालविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौंदर्यप्रसाधने पुरवली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील सात दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या सात तरुण दासींना त्याने अंत:पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली.