Esther 5:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला त्याने सुरुवात केली. आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वाच्च अधिकाराचे स्थान या सगव्व्यांची तो बढाई मारु लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या धनसंपत्तीची थोरवी, आपल्या संततीचा विस्तार, राजाने आपणांस कशी बढती देऊन राजाचे सरदार व सेवक ह्यांच्यावरील उच्च पद दिले, हे सर्व त्याने त्यांना निवेदन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.