Esther 5:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागायचे ते मागेन.” मर्दखयासाठी फाशीचा खांब
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महाराजांची मजवर कृपा असेल आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, माझी विनंती मान्य करा, आपण उद्या पुन्हा हामानाला बरोबर घेऊन आपल्यासाठी मी तयार करणार असलेल्या मेजवानीला यावे; आणि मग उद्या मी महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.”