Esther 5:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन:स्थितीत राजमहालातून निघाला. पण मर्दखयला राजद्वाराशी पाहाताच त्याला मर्दखयचा आतिशय संताप आला. हामान तिथून निघाला तेव्हा मर्दखयने त्याला मान न दिल्यामुळे हामान रागाने वेडापिसा झाला. मर्दखय हामानला घाबरत नव्हता आणि त्याचाच हामानला राग आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेजवानीवरून घरी परतल्यावर हामान खूपच आनंदात होता. परंतु राजवाड्याच्या दाराजवळ बसलेल्या मर्दखयास बघितले व आपल्यासमोर तो उठून उभा राहिला नाही, घाबरला नाही, हे पाहून हामान संतापाने भरून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन:स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.