Esther 6:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हामान तेव्हा नुकताच राजमहालाबाहेरच्या आवारात शिरत होता. आपण उभारायला सांगितलेल्या वधस्तंभावर मर्दखयला फाशी द्यायला त्याला राजाला सांगायचे होते. राजाला त्याची चाहूल लागली. राजा म्हणाला, “आत्ता चौकात कोण आले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने विचारले, “चौकात कोण आहे?” त्या वेळी, तयार केलेल्या फाशी देण्याच्या खांबावर मर्दखयास फाशी द्यावे अशी राजाकडे विनंती करण्यास हामान राजमंदिराच्या बाहेरल्या चौकात आला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने विचारले, “राजदरबारात कोण आहे?” त्याचवेळी हामानाने नुकताच राजदरबाराच्या बाहेरच्या चौकात प्रवेश केला. आपण उभ्या केलेल्या सुळावर मर्दखयाला फाशी देण्याची परवानगी राजापाशी मागण्यासाठी तो आलेला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा म्हणाला “चौकात कोण आहे?” हामान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता.