Esther 7:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग एस्तेर राणी म्हणाली, “महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा एस्तेर राणीने उत्तर दिले, “महाराज, जर मी तुमची कृपा संपादन केली असेन, आणि महाराजांच्या मर्जीला येत असेन, तर माझे प्राण वाचवा—हीच माझी विनंती आहे, आणि माझ्या लोकांचे—ही माझी मागणी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे.