Esther 8:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजाच्या आज्ञापत्राची प्रत पाठवायची होती. हे आज्ञापत्र म्हणजे कायदाच होता. प्रत्येक प्रांतात तो कायदा लागू होता. राजाच्या साम्राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये तो जाहीर केला गेला. यहूद्यांनी या विशिष्ट दिवशी तयार राहावे, त्यांना शत्रूला शह देता यावा म्हणून हा आदेश पाठवला गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहूद्यांनी तयार व्हावे असे सर्व लोकांना जाहीर करण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या पत्राच्या प्रतिद्वारे प्रत्येक प्रांतातील सर्व जातीच्या नागरिकांना कळविण्यात आले, हे फर्मान सर्वत्र कायदा म्हणून मान्य करण्यात यावे की आपल्या शत्रूचा सूड घेण्यासाठी या दिवशी यहूदी लोक सज्ज राहतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो लेख हुकूम म्हणून प्रत्येक प्रांतात द्यायचा होता त्याची प्रत सर्व लोकांस जाहीर झाली, की यहूद्यांनी त्या दिवशी शत्रूचा सूड उगवण्यासाठी तयार रहावे.