Esther 8:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ती म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझ्या मनास येत असेल तर कृपया माझ्यासाठी एवढे कर. तुला ही कल्पना चांगली वाटत असेल तर कृपया तू असे कर. तुझी माझ्यावर मर्जी असल्यास हामानने पाठवलेला आदेश रद्द करणारा आदेश लिही. राजाच्या अंमलाखाली असलेल्या सर्व प्रांतांतील यहुद्यांच्या संहाराचा कट अगागी हामानने केला होता . आणि तो अंमलात आणण्यासाठी त्याने तशा आज्ञा पाठवल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती म्हणाली, “महाराज, आपल्या मर्जीस येत असेल व मजवर आपली कृपादृष्टी असेल, व ते योग्य वाटत असेल, आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, सर्व प्रांतांतील यहूद्यांचा नायनाट करण्याविषयीचा अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा हुकूम रद्द करणारे फर्मान काढून ते सर्वत्र पाठविण्यात यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती म्हणाली, “जर राजाच्या मर्जीस आल्यास, आणि मजवर तुमची कृपादृष्टी झाली असल्यास, जर राजाला ही गोष्ट योग्य वाटली आणि त्यांच्या दृष्टीने मी त्यास आवडले तर हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान याने सर्व प्रांतातील यहूद्यांचा नायनाट करण्याचे पाठवलेले पत्रे रद्द करणारा आदेश लिहावा.