Esther 9:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा त्यांनी मन:पूत समाचार घेतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे यहूदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तलवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला; मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या नेमलेल्या दिवशी यहूदी लोकांनी आपल्या शत्रूंची कत्तल करून संहार केला व त्यांचा नाश केला आणि जे त्यांचा तिरस्कार करीत असत, त्यांना आवडेल तसे वागविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला.