Exodus 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांची वाढ थांबवावी म्हणून आपण काहीतरी उपाय योजना केलीच पाहिजे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्राएल लोक आपल्या शत्रुला जाऊन मिळतील; आणि मग ते आपला पराभव करुन आपणापासून निसटून जातील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चला त्यांच्याशी चातुर्याने वागू या, नाहीतर त्यांची संख्या अजून वाढेल, आणि लढाई झाली तर ते आपल्या शत्रूंशी एक होतील आणि देश सोडून जातील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.”